मी, मागील ५५ वर्षांपासून विविध व्यवसाय व विविध कंपन्यामध्ये नोकरी केलेली आहे. काही ठळक कार्यक्षेत्र नमुद करावयाची ठरल्यास, मागील २००६ ते २०१५ दरम्यान गोरगरिबांसाठी सुमारे १२५० फ्लॅटस वाळूज, जोगेश्वरी व शेंद्रा एम.आय.डी.सी. (छ. संभाजीनगर) मध्ये बांधले. सदर फ्लॅटस् नाममात्र किंमत २,५०,००० ते ३,५०,००० रुपयास गरजुंना उपलब्ध करून दिले. सदर १२५० कुटुंब गुण्यागोविंदाने व तृप्ततेच्या भावनेने राहतात.
आयुष्याच्या ह्या वळणावर जेव्हा मी मागे वळून पाहतो, तेव्हा कर्तव्यपुर्ती मधील एक गोष्ट राहिली, हे स्पष्टपणे जाणवते व ती खंत मनात आहे. ती म्हणजे मी ज्या गावातुन / तालुक्यातुन आलो, तेथील तमाम जनतेसाठी मी काय केलं? म्हणुन शरिर आणि मनातील उर्जा एकवटुन एक कार्यक्रम मनात बेतला आहे, तो असा –
खुप कारणे अशी आहे की, ज्याने जनमानसातील संवाद संपुष्टात आला आहे. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा भारताची लोकसंख्या ३५ कोटी होती. गावा-गावातील लोक एकमेकांशी आदराने व प्रेमाने तसेच, गाव हे एक कुटुंब ह्या भावनेने रहात असत. माझ्या लहानपणी मी बघायचो, कोणी पै-पाहुणा आला तर तो चांगला ८-१० दिवस रहायचा व संपूर्ण गावाचा पाहुणा व्हायचा. खेडोपाडी, तालुक्याच्या गावीसुद्धा माणुस आपुलकी आणि प्रेमाने सदैव संपन्न असायचा.
आज भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे. कारणे काहीही असोत,परंतु माणूस एकटा पडला आहे. वाढलेल्या साक्षरतेचे, विकासाचे हे सर्वात मोठे अपयश आहे. ही परिस्थिती भारतात सर्वदुर आहे.
मी पामर ही परिस्थिती तर बदलु शकत नाही, परंतु देशाच्या एका कोपऱ्यात (वैजापुर तालुक्यात) किमान २० मोठ्या खेड्यांमध्ये ओपन जीम पार्क व सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव कार्यालय उभारू इच्छितो.
गावातील प्रत्येकाचं आणि संपूर्ण गावाच्या मालकीचं असणारे ओपन जीम पार्क, चिल्ड्रेन पार्क व सामाजिक व कौटुंबिक उत्सव कार्यालय स्थापन करण्याचा मानस आहे. याकरिता प्रत्येक गावासाठी ५ लाखापर्यंत खर्च येईल. हे शक्य व्हावे यासाठी मी वयाच्या ७४ व्या वर्षी शतायुषी भोजन सामुग्री नावाचा हा नवीन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातील सर्व नफा याच कामी खर्च होणार आहे. परमेश्वर कृपेने, मला या वयात स्वतःच्या प्रपंचासाठी काही करण्याची गरज नाही.
हल्ली सर्व प्रकारच्या कामांसाठी विविध यंत्रसामुग्री उपलब्ध आहे. त्यामुळे मजुरांची गरज नाही. भारतात, सर्वच राज्यात, संबंधित सरकार व केंद्र सरकारच्या रेवडी-संस्कृतीमुळे मोफत राशन, निवारा, दवाखाना तसेच गोरगरिबांना दर महिन्यास शासनातर्फे मिळणारी व बँकेत सरळ जमा होत असलेली रक्कम या सर्व सोयींमुळे खेड्यांमध्ये कोणीही काम करत नाही, यामुळे राष्ट्राचे अतोनात नुकसान होत आहे. या कृत्रिम बेकारीमुळे, ग्रामीण जनतेमध्ये सुद्धा हृदयविकार, उच्च रक्तदाब, कॅन्सर, मधुमेह इ. रोगांनी थैमान घातले आहे. पन्नास वर्षापुर्वी वरील प्रकारात एकही रोगी खेड्यात नसायचा.
अन्न हेच औषध (Food is Medicine) या विषयावर, आयुर्वेदाच्या आधारावर जगभर अनेक वर्षांपासुन संशोधन चालु आहे. भारत भुमीतील आयुर्वेदाने अनंत काळापासुन औषधी वनस्पती आणि प्रचलित व उपलब्ध अन्नातील औषधी गुण या विषयावर शास्त्रसंमत विवेचन आणि उपचार पद्धती सांगितल्या आहेत.
याच आधारे आम्ही काही निवडक धान्ये, कडधान्ये आणि तृणधान्ये काही विशिष्ट प्रमाणात एकत्र करून, नवग्रह आटा, मधुमेह मुक्ती आटा, हार्मोन्स संतुलन आटा व पित्तशामक आटा तयार केला आहे व ही सर्व उत्पादने, छ. संभाजीनगर मधील MIT कॉलेजमधील Food Testing Lab व Government Food Testing Laboratory मधुन विविध चाचण्या केल्या. तसेच काही आहार-तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व उत्पादने तयार करण्यात आली. सुमारे ८ महिने, विविध मधुमेह व हृदयविकार रोग्यांवर चाचणी करण्यात आली.
नवग्रह आटा, मधुमेह मुक्ती आटा, शक्तीशाली हार्मोन संतुलन आटा व पित्तशामक आटा बाजारासाठी उपलब्ध करून देत आहोत.
नवग्रह-आटा जीवसृष्टीवर विविध ग्रहांचा परिणाम होतोच हे आता शास्त्राने सिद्ध केले आहे. नवग्रहांची धान्ये विशिष्ट प्रमाणात एकत्र करून, खाद्य म्हणुन उपयोगात आणल्यास मधुमेह, हृदयविकार, स्वादुपिंड, यकृत, मुत्रविकार, अपचन, बद्धकोष्टता इ. आजारावर रामबाण आणि त्वरीत उपयोगी ठरतात असे सिद्ध झाले आहे.
नवग्रह आटा खालील प्रक्रियेतुन जातो.
सर्व धान्ये, कडधान्ये आणि तृणधान्ये
Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294
GSTIN: 27AMRPK5827A1ZY
Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.