जसे खाल तसे व्हाल

"जसे खाल तसे व्हाल"

What you eat is, what you are..!

आज भारतात लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वच जनता विषारी अन्नधान्य फळे व भाजीपाला खात आहेत. हल्ली पुर्वी ऐकिवात नसलेले, तरुणांपासून वृद्धांपर्यंत हृदयविकार, डायबिटीस, बद्धकोष्ठता, यकृत व मूत्राशयाचे रोग सर्व दूर पसरलेले आहेत. त्याची प्रमुख दोन कारणे –

(१) १९६७ पूर्वी म्हणजे, भारतात हरित क्रांती येण्याअगोदर रोगराईचे प्रमाण अत्यल्प होते. हवा, पाणी व जमीन प्रदूषित नव्हते. १९६७ मध्ये हरित क्रांतीस सुरुवात झाली. अधिक उत्पादनासाठी कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर सुरू झाला. हल्ली भारतात सर्वत्र वापरली जात असणारी कीटकनाशके व रासायनिक खतांनी शेत जमिनी नासवून टाकल्या आहेत. रासायनिक खते व कीटकनाशके जमिनीत खोलवर पाझरली आहेत.

(२) १९४७ नंतर भारतात आर्थिक समृद्धी रोगराई घेऊन आली. कारखान्यातील रासायनिक धुर हवेत सर्वत्र पसरला आणि प्रदूषित सांडपाणी नदी-नाल्यात सोडल्यामुळे जमिनीतील पाणी प्रदूषित झाले.

इ.स. २००० अगोदर कोणी कल्पना केली नसेल की, बाटलीत पाणी विकत मिळेल आणि नाईलाजाने ते प्यावे लागेल. देशभरात कुठे जा, अगदी हिमालय पर्वतावर सुद्धा RO चेच पाणी प्यावे लागते. आपल्या हातात एवढेच शिल्लक आहे की, आपण अशीच अन्नधान्य, फळे व भाजीपाला खावी की, जे पावसाच्या पाण्यावर येतात व ज्याला रासायनिक खते व कीटकनाशकांची आवश्यकता लागत नाही. कोरडवाहु पिकांवर शेतकरी, रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर करीत नाही. उदा. ज्वारी, बाजरी, जौ (Barley) डाळवर्गीय पिके.

हल्लीच्या आपल्या खाद्य संस्कृती प्रमाणे, सर्वसाधारणपणे आपल्या जेवणात, ८० टक्के च्या वर गहू किंवा तांदुळ या धान्याचा समावेश असतो. गहू किंवा तांदुळ हे बागायती पिके असल्यामुळे विहिरींच्या प्रदुषित पाण्यावरच लागवड करावी लागते. मधुमेहींना (डायबिटीस) डॉक्टर सर्वप्रथम साखर व त्यानंतर गहू आणि तांदूळ म्हणजे भात खाण्यास मनाई करतात. भातामुळे पोट फुगी, वजन वाढण्याची व रक्तातील साखर वाढण्याची समस्या उद्भवते. गव्हामध्ये ग्लूटेन असते. या चिकट पदार्थांची बऱ्याच लोकांना ॲलर्जी असते. ग्लूटेन आतड्यांना चिटकून राहते व पोट साफ होत नाही. त्यामुळे वात विकार व बद्धकोष्ठता इत्यादी त्रास होतात व अनेक रोग उद्भवतात. गव्हात असणाऱ्या कार्बोहायड्रेटस मध्ये ९० टक्के स्टार्च असते व त्यामुळे ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. आपल्या देशात विकले जाणारे अन्नधान्याचे असे पुष्कळ प्रकार आहे, जे रोग प्रतिबंधक व रोग निवारक आहेत. अशीच निवडक व बहुविध धान्याच्या पिठांची(आटा) मालिका आपणास उपलब्ध करून देत आहोत.

SHATAYUSHI BHOJAN SAMUGRI

Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar,
(Aurangabad), M.S-431003, Mob.: 9730990294

GSTIN: 27AMRPK5827A1ZY

Contact Info

Address : Plot No 436, GMH Complex CIDCO, N-3, Chh. Sambhajinagar, (Aurangabad), - 431003.

+91 9730990294
info@shatayushibhojansamugri.com