मी, मागील ५५ वर्षांपासून विविध व्यवसाय व विविध कंपन्यामध्ये नोकरी केलेली आहे. काही ठळक कार्यक्षेत्र नमुद करावयाची ठरल्यास, मागील २००६ ते २०१५ दरम्यान गोरगरिबांसाठी सुमारे १२५० फ्लॅटस वाळूज, जोगेश्वरी व शेंद्रा एम.आय.डी.सी. मध्ये बांधले. सदर फ्लॅटस् नाममात्र किंमत २,५०,००० ते ३,५०,००० रुपयास गरजुंना उपलब्ध करून दिले. सदर १२५० कुटुंब गुण्यागोविंदाने व तृप्ततेच्या भावनेने राहतात.